<font face="mangal" size="3px">बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित क& - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ खालील निर्देश - श्री. आनंद को ऑपरेटिव बँक लि., चिंचवड, पुणे, महाराष्ट्र - मुदतवाढ
सप्टेंबर 24, 2021 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ खालील निर्देश - भारतीय रिझर्व्ह बँकेने, निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय/डी-16/12.22.474/2018-19 दि. जून 21, 2019 अन्वये, श्री. आनंद को ऑपरेटिव बँक लि., चिंचवड, पुणे, महाराष्ट्र ह्यांना, जून 25, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांसाठी निर्देशांखाली ठेवले होते. ह्या निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती व ती सर्वात शेवटून, सप्टेंबर 24, 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती. (2) जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देत आहे की, निर्देश डीओआर.एमओएन.डी-37/12.22.474/2021-22 दि. सप्टेंबर 23, 2021 अनुसार वरील निर्देश, वरील बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर, नोव्हेंबर 24, 2021 पर्यंत लागु असतील. (3) संदर्भित निर्देशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील मुदतवाढ कळविणा-या, सप्टेंबर 23, 2021 रोजीच्या निर्देशांची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी, वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. (4) भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या वरील मुदतवाढीचा/बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशन: 2021-2022/928 |