RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78527023

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निदेश - दि कपोल सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ

नोव्हेंबर 01, 2021

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निदेश - दि कपोल सहकारी
बँक लि., मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने, निदेश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय./डी-9/12.22.111/2016-17 दि. मार्च 30, 2017 अन्वये, दि कपोल सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, मार्च 30, 2017 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांसाठी निदेशांखाली ठेवले होते. वरील निदेशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती व ती शेवटून ऑक्टोबर 31, 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती.

(2) जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निदेश देते की, निदेश डीओआर.एमओएन.डी-43/12.22.111/2021-22 दि. ऑक्टोबर 27, 2021 अन्वये वरील निदेश त्या बँकेला, पुनरावलोकनाच्या अटींवर, एप्रिल 30, 2022 पर्यंत लागु असतील.

(3) संदर्भित निदेशांमधील इतर सर्व अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील मुदतवाढ अधिसूचित करणा-या दि. ऑक्टोबर 27, 2021 रोजीच्या निदेशाची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात, जनतेच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे.

(4) भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मुदतवाढीचा आणि/किंवा बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या वित्तीय स्थितीबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

(योगेश दयाल)   
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशनी : 2021-2022/1125

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?