<font face="mangal" size="3px">बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ ख - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., वरुड, जिल्हा - अमरावती, महाराष्ट्र - कालावधीत वाढ
जुलै 17, 2019 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को- बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, जनहितासाठी, भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., वरुड, जिल्हा -अमरावती, महाराष्ट्र ह्यांना, जानेवारी 17, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निर्देश दिले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने आता ह्या निर्देशांना आणखी तीन महिन्यांची म्हणजे जुलै 18, 2019 ते ऑक्टोबर 17, 2019 पर्यंतची मुदतवाढ पुनरावलोकनाच्या अटीवर दिली आहे. ह्या निर्देशानुसार ठेवींची निकासी/स्वीकार ह्यावर काही निर्बंध आणि/किंवा मर्यादांच्या अटी घालण्यात आल्या आहेत. जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशाची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व्ह बँक करु शकते. हे निर्देश देण्यात आले ह्याचा अर्थ, भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधासह करणे सुरु ठेवू शकते. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2019-2020/179 |