<font face="Mangal" size="3">बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ ख&# - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - बिदर महिला अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बिदर
मार्च 1, 2019 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - बिदर महिला अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बिदर. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, बिदर महिला अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बिदर ह्यांना विशिष्ट निर्देश दिले होते व त्या निर्देशांन्वये, वरील बँक, फेब्रुवारी 28, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, आरबीआयची लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, कोणतीही कर्जे किंवा अग्रिम राशींचे प्रदान करणार नाही किंवा नूतनीकरण करु शकणार नाही, कोणतीही गुंतवणुक करणार नाही, निधी कर्जाऊ घेऊन किंवा नवीन ठेवी स्वीकारुन कोणतीही जबाबदारी घेणार नाही, तिचे दायित्व किंवा जबाबदारी पूर्ण करण्यासाठी, किंवा अन्यथा, कोणतीही तडजोड किंवा व्यवस्था करुन, आरबीआयने फेब्रुवारी 21, 2019 रोजीच्या निर्देशित विहित केल्यानुसार सोडल्यास, तिच्या कोणत्याही मालमत्तेची किंवा अॅसेट्सची विक्री, हस्तांतरण किंवा वासलात करणार नाही. वरील निर्देशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. विशेषतः, प्रत्येक बचत बँक किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव दिलेले ठेव खाते ह्यामधून, रु.1,000/- (रुपये एक हजार) पर्यंतची रक्कम, आरबीआयने दिलेल्या वरील निर्देशातील अटींवर काढण्यास परवानगी दिली जावी. आरबीआयने दिलेल्या वरील निर्देशांचा अर्थ, वरील बँकेचा बँकिंग परवाना आरबीआयने रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. बँकेची परिस्थिती सुधारे पर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधासह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार आरबीआय करु शकते. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2082 |