RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78516834

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव लि. निलंगा, जिल्हा - लातुर, महाराष्ट्र - मुदतवाढ

ऑक्टोबर 17, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-
ऑपरेटिव लि. निलंगा, जिल्हा - लातुर, महाराष्ट्र - मुदतवाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने, जनतेच्या हिताच्या दृष्टीने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव लि. निलंगा, जिल्हा - लातुर, महाराष्ट्र ह्यांना, फेब्रुवारी 16, 2019 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून निर्देशांखाली ठेवले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने आता ह्या निर्देशांना, आणखी सहा महिन्यांची, म्हणजे ऑक्टोबर 16, 2019 ते एप्रिल 15, 2020 पर्यंतची मुदतवाढ, पुनरावलोकनाच्या अटीवर दिली आहे. निर्देशांमधून काही निर्बंध आणि /किंवा ठेवी काढून घेण्यावर / स्विकारण्यावर मर्यादा घालण्यात आल्या. सविस्तर निर्देश वरील बँकेच्या कार्यालयात जनतेच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आले आहेत. ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार भारतीय रिझर्व्ह बँक करु शकते. हे निर्देश देण्यात आले ह्याचा अर्थ, भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. तिची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत वरील बँक, तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते.

(योगेश दयाल)   
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/972

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?