<font face="mangal" size="3">बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) च्या क - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) च्या कलम 35अ खालील निर्देश - पद्मश्री डॉ. विठ्ठलराव
विखे पाटील को-ऑपरेटिव बँक लि. नाशिक, महाराष्ट्र - मुदतवाढ
नोव्हेंबर 20, 2018 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) च्या कलम 35अ खालील निर्देश - पद्मश्री डॉ. विठ्ठलराव बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने जनहितासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील को-ऑपरेटिव बँक लि. नाशिक, महाराष्ट्र ह्यांना मे 19, 2018 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून निर्देश दिले होते. भारतीय रिझर्व बँकेने आता, ह्या निर्देशांना आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे, नोव्हेंबर 19, 2018 ते मे 18, 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. वरील निर्देशांची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. परिस्थितीवर अवलंबून वरील निर्देशात बदल करण्याचा विचार भारतीय रिझर्व बँक करु शकते. हे निर्देश देण्यात आले ह्याचा अर्थ, भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत ती बँक निर्बंधांसह तिचा व्यवसाय करणे सुरु ठेवू शकते. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1169 |