<font face="Mangal" size="3">बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ ख&# - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - रुपी को-ऑपरेटिव बँक लि., पुणे, महाराष्ट्र
फेब्रुवारी 27, 2019 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - रुपी को-ऑपरेटिव बँक लि., पुणे, महाराष्ट्र रुपी को-ऑपरेटिव बँक लि., पुणे, महाराष्ट्र ह्यांना, फेब्रुवारी 22, 2013 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, निर्देश दि. फेब्रुवारी 21, 2013 अन्वये निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतरच्या निर्देशान्वये, शेवटचे निर्देश दि. नोव्हेंबर 27, 2018 ह्या निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती व ते निर्देश पुनरावलोकनाच्या अटीवर, दि. फेब्रुवारी 28, 2019 पर्यंत वैध होते. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे निर्देश देते की, वरील बँकेला दिलेले वेळोवेळी सुधारित केलेले व शेवटून फेब्रुवारी 28, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले निर्देश फेब्रुवारी 21, 2013 रोजीचे निर्देश, निर्देश दि. फेब्रुवारी 26, 2019 अन्वये, वरील बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी तीन महिन्यांसाठी म्हणजे, मार्च 1, 2019 ते मे 31, 2019 पर्यंत लागु असणे सुरुच राहील. वरील मुदतवाढ अधिसूचित करणा-या फेब्रुवारी 26, 2019 रोजीच्या निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. भारतीय रिझर्व बँकेने दिलेली मुदतवाढ आणि/किंवा सुधारणा ह्यांचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2047 |