<font face="mangal" size="3">बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ ख - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - रुपी को-ऑपरेटिव बँक लि. पुणे, महाराष्ट्र
मे 31, 2019 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - रुपी को-ऑपरेटिव बँक लि. पुणे, महाराष्ट्र रुपी को-ऑपरेटिव बँक लि. पुणे, महाराष्ट्र ह्यांना, निर्देश दि. फेब्रुवारी 21, 2013 अन्वये, फेब्रुवारी 22, 2013 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर देण्यात आलेल्या निर्देशांन्वये वरील निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती व त्यातील शेवटचे निर्देश फेब्रुवारी 25, 2019 रोजीचे होते व ते, मे 31, 2019 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर वैध होते. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित केले जाते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, वरील बँकेला फेब्रुवारी 21, 2013 रोजी देण्यात आलेले, वेळोवेळी सुधारित केलेले व शेवटून मे 31, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले निर्देश, निर्देश दि. मे 27, 2019 अन्वये वरील बँकेला आणखी तीन महिन्यांसाठी, म्हणजे जून 1, 2019 ते ऑगस्ट 31, 2019 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर लागु असतील, संदर्भित निर्देशांमधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील मुदतवाढ वाढविण्याच्या, मे 27, 2019 रोजीच्या निर्देशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली वरील मुदतवाढ आणि/किंवा बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये. अजित प्रसाद प्रेस प्रकाशन : 2018-2019/2829 |