RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78516746

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - रुपी को-ऑपरेटिव बँक लि. पुणे, महाराष्ट्र

ऑगस्ट 30, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - रुपी को-ऑपरेटिव बँक लि. पुणे, महाराष्ट्र

निर्देश दि. फेब्रुवारी 21, 2013 अन्वये, रुपी को-ऑपरेटिव बँक लि. पुणे, महाराष्ट्र ह्यांना, फेब्रुवारी 22, 2013 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतरच्या निर्देशांन्वये, ह्या निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती व मे 27, 2019 रोजीच्या शेवटच्या निर्देशान्वये ती वैधता पुनरावलोकनाच्या अटीवर ऑगस्ट 31, 2019 पर्यंत होती.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, वरील बँकेला वेळोवेळी सुधारित केलेले व शेवटून ऑगस्ट 31, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले फेब्रुवारी 21, 2013 रोजीचे निर्देश, वरील बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर, निर्देश दि. ऑगस्ट 28, 2019 अन्वये, आणखी तीन महिन्यांसाठी, म्हणजे, सप्टेंबर 1, 2019 ते नोव्हेंबर 30, 2019 पर्यंत लागु असतील. संदर्भित निर्देशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

ऑगस्ट 28, 2019 रोजीच्या निर्देशांची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी, वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली वरील मुदतवाढ आणि/किंवा केलेला बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

योगेश दयाल    
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/577

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?