RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78506846

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - सिकार अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., सिकार (राजस्थान)

नोव्हेंबर 9, 2018

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खालील निर्देश - सिकार अर्बन को-ऑपरेटिव
बँक लि., सिकार (राजस्थान)

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, (आरबीआय), सिकार अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., सिकार ह्यांना काही निर्देश दिले होते की ज्यामुळे, नोव्हेंबर 9, 2018 रोजीचे व्यवहार बंद झाल्यानंतर वरील बँक, आरबीआयची लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, कोणत्याही कर्जाचा व अग्रिम राशींचा स्वीकार किंवा नूतनीकरण करणार नाही, कोणतीही गुंतवणूक करणार नाही, निधी कर्जाऊ घेऊन व नवीन ठेवी स्वीकारुन कोणतीही जबाबदारी घेणार नाही, तिचे दायित्व व जबाबदा-या पूर्ण करण्यासाठी किंवा अन्यथा, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा करार करुन आरबीआयच्या, ऑक्टोबर 26, 2018 रोजीच्या निर्देशात अधिसूचित केलेले सोडल्यास, तिच्या कोणत्याही मालमत्तेची विक्री, वासलात किंवा हस्तांतरण करणार नाही - ह्या निर्देशांची एक प्रत बँकेच्या कार्यालयात जनतेच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. प्रत्येक बचत खाते किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव दिलेले ठेव खाते ह्यामधील शिल्लक रकमेमधून, आरबीआयच्या वरील निर्देशातील अटींवर रु.2,000/-(रुपये दोन हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी दिली जावी.

वरील निर्देश दिले ह्याचा अर्थ, आरबीआयने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत, ती निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1085

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?