<font face="mangal" size="3">बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35अ अंतर् - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35अ अंतर्गत निर्देश - दि सीकेपी को-ऑपरेटिव बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र
29 नोव्हेंबर 2017 बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35अ अंतर्गत निर्देश - भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 30 एप्रिल 2014 रोजी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने दि सीकेपी को-ऑपरेटिव बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र, वर दिनांक 2 मे 2014 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिर्देश लादण्यात आले होते. निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आलेली आहे आणि ह्या निर्देशांचा वैधता कालावधी, गेल्या वेळेस दिनांक 26 जुलाई 2017 च्या सुधारित निर्देशा अनुसार, दिनांक 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35अ, उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिनांक 30 एप्रिल 2014 रोजी दिलेल्या निर्देश व नंतर वेळोवेळी दिलेल्या सुधारित निर्देशा अनुसार निर्देशांचा वैधता कालावधी जो दिनांक 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत वाढवला होता, तो दिनांक 23 नोव्हेंबर 2017 च्या सुधारित निर्देशा द्वारा दिनांक 1 डिसेंबर 2017 ते दिनांक 31 मार्च 2018 पर्यंत चार महिन्यांसाठी वाढवला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल. संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी, बदललेल्या नाहीत. दिनांक 23 नोव्हेंबर 2017 च्या सुधारित आदेशाची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा आदेशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे. अजीत प्रसाद प्रेस प्रकाशनी: 2017-2018/1476 |