RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78523360

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - दि सीकेपी को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र

जून 26, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - दि सीकेपी को-ऑपरेटिव बँक
लि. मुंबई, महाराष्ट्र

मे 2, 2014 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून दि सीकेपी को-ऑपरेटिव बँक लि. मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, निर्देश दि. एप्रिल 30, 2014 अन्वये निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. वरील निर्देशांची वैधता त्यानंतरच्या निर्देशांन्वये वाढविण्यात आली होती व शेवटचे निर्देश मे 30, 2019 रोजीचे असून त्याची वैधता, पुनरावलोकनाच्या अटीवर, जून 30, 2019 पर्यंत होती.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, वरील बँकेला देण्यात आलेले व वेळोवेळी सुधारित केलेले आणि शेवटून 30 जून, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले, निर्देश दिनांक 30 जून, 2014, निर्देश दि. जून 24, 2019 अन्वये वरील बँकेला, आणखी तीन महिन्यांसाठी, म्हणजे जुलै 1, 2019 ते सप्टेंबर 30, 2019 पर्यंत पुनरावलोकनाचे अटीवर लागु असणे सुरुच राहील.

वरील मुदतवाढ अधिसूचित करणा-या, निर्देश दि. जून 24, 2019 ची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली वरील मुदतवाढ आणि/किंवा बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2018-2019/3051

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?