<font face="mangal" size="3">बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ ख& - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - दि कपोल को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र
मार्च 31, 2018 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - दि कपोल को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र दि कपोल को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, मार्च 30, 2017 रोजीच्या निर्देशान्वये, मार्च 30, 2017 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांसाठी निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निर्देशांची वैधता, पुनरावलोकनाच्या अटीवर, त्यानंतरच्या निर्देशान्वये वाढविण्यात आली होती व शेवटची मुदतवाढ, सप्टेंबर 25, 2017 रोजीच्या निर्देशान्वये मार्च 31, 2018 पर्यंत वाढविण्यात आली होती. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक निर्देश देत आहे की, दि कपोल को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, सप्टेंबर 25, 2017 रोजीच्या निर्देशान्वये दिलेल्या सर्वात शेवटी, मार्च 31, 2018 पर्यंत वैधतेची मुदतवाढ करण्यात आलेल्या वेळोवेळी सुधारित केलेल्या, मार्च 30, 2017 रोजीचे निर्देश, त्या बँकेला सप्टेंबर 25, 2017 च्या निर्देशान्वये, आणखी चार महिन्यांसाठी म्हणजे, एप्रिल 1, 2018 ते जुलै 31, 2018 पर्यंत मार्च 20, 2018 च्या निर्देशान्वये पुनरावलोकनाच्या अटीवर लागु होतील. वेळोवेळी सुधारित केलेल्या संदर्भित निर्देशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील बदल अधिसूचित करणा-या मार्च 20, 2018 रोजीच्या निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. भारतीय रिझर्व बँकेने केलेल्या वरील बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2595 |