RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78503616

कलम 35अ, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) खाली निर्देश –
दि कराड जनता सहकारी बँक लि., कराड, महाराष्ट्र - मुदतवाढ

मे 9, 2018

कलम 35अ, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) खाली निर्देश –
दि कराड जनता सहकारी बँक लि., कराड, महाराष्ट्र - मुदतवाढ

दि कराड जनता सहकारी बँक लि., कराड, महाराष्ट्र ह्यांना नोव्हेंबर 9, 2017 रोजीच्या व्यवहार बंद झाल्यापासून, 6 (सहा) महिन्यांच्या कालावधीसाठी, निर्देश दि. नोव्हेंबर 7, 2017 अन्वये निर्देशांखाली ठेवण्यात आले होते.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित, कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन येथे निर्देश देत आहे की, वरील बँकेला, नोव्हेंबर 7, 2017 रोजी देण्यात आलेले निर्देश, त्या बँकेला, आणखी 6 (सहा) महिन्यांसाठी, म्हणजे मे 10, 2018 ते नोव्हेंबर 9, 2018 पर्यंत, निर्देश दि. मे 3, 2018 अन्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर लागु असतील.

वरील मुदतवाढ कळविणा-या मे 3, 2018 रोजीच्या निर्देशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने दिलेली मुदतवाढ आणि/किंवा बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली असल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2949

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?