<font face="mangal" size="3">बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ ख& - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - दि मराठा सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र
सप्टेंबर 30, 2019 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - दि मराठा सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र दि मराठा सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, ऑगस्ट 31, 2016 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, निर्देश दि. ऑगस्ट 31, 2016 अन्वये निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतरच्या निर्देशान्वये ह्या निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती व शेवटचे निर्देश मार्च 25, 2019 रोजीचे असून, ते पुनरावलोकनाच्या अटीवर सप्टेंबर 30, 2019 पर्यंत वैध होते. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, वरील बँकेला देण्यात आलेले, वेळोवेळी सुधारित केलेले व शेवटून दि. सप्टेंबर 30, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले निर्देश दि ऑगस्ट 31, 2016 पुनरावलोकनाच्या अटीवर, वरील बँकेला निर्देश दि. सप्टेंबर 25, 2019 अन्वये आणखी तीन महिन्यांसाठी, म्हणजे, ऑक्टोबर 1, 2019 ते डिसेंबर 31, 2019 पर्यंत लागु असणे सुरुच राहील. वरील मुदतवाढ अधिसूचित करणा-या सप्टेंबर 25, 2019 रोजीच्या निर्देशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली वरील मुदतवाढ आणि/किंवा केलेला बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशन : 2019-2020/816 |