RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78518158

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - दि मुधोळ को-ऑपरेटिव्ह बँक लि., पोस्ट - मुधोळ, बागलकोट जिल्हा, कर्नाटक

एप्रिल 9, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - दि मुधोळ को-ऑपरेटिव्ह बँक
लि., पोस्ट - मुधोळ, बागलकोट जिल्हा, कर्नाटक

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँकेने, दि मुधोळ को-ऑपरेटिव्ह बँक लि., पोस्ट - मुधोळ, जिल्हा बागलकोट, कर्नाटक ह्यांना काही निर्देश दिले होते आणि त्यानुसार, एप्रिल 8, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून वरील बँक, रिझर्व्ह बँकेची लेखी पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय, कोणतीही नवीन कर्जे किंवा अग्रिम राशी देणार नाही किंवा नूतनीकरण करणार नाही, कोणतीही गुंतवणुक करणार नाही, निधी कर्जाऊ घेणे व नवीन ठेवी स्वीकारणे ह्यासह कोणतीही जबाबदारी/दायित्व घेणार नाही, तिची जबाबदारी किंवा दायित्व म्हणून कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा करार करुन, एप्रिल 2, 2019 रोजी आरबीआयने दिलेल्या निर्देशात निर्देशित केल्यानुसार सोडल्यास, तिच्या कोणत्याही मालमत्तेची किंवा अॅसेट्सची विक्री, हस्तांतरण किंवा अन्यथा वासलात करु शकणार नाही. ह्या निर्देशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. विशेषतः, प्रत्येक बचत बँक खाते किंवा चालु खाते किंवा दुसरे कोणतेही ठेव खाते ह्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून, आरबीआय वरील निर्देशांमध्ये दिलेल्या अटीवर, रु.1,000/- (रुपये एक हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देण्यात येत आहे.

आरबीआयने दिलेल्या ह्या निर्देशांचा अर्थ, आरबीआयने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार भारतीय रिझर्व्ह बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

प्रेस प्रकाशन : 2018-2019/2407

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?