RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78523219

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खालील निर्देश - दि नीड्स ऑफ लाईफ को.ऑप. बँक लि., मुंबई, महाराष्ट्र

एप्रिल 30, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खालील निर्देश - दि नीड्स ऑफ लाईफ
को.ऑप. बँक लि., मुंबई, महाराष्ट्र

निर्देश दि. ऑक्टोबर 26, 2018 अन्वये, दि नीड्स ऑफ लाईफ को.ऑप. बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, ऑक्टोबर 29, 2018 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, पुनरावलोकनाच्या अटीवर, सहा महिन्यांच्या कालावधींसाठी निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निर्देशाची वैधता दि. एप्रिल 29, 2019 पर्यंत होती.

(2) जनतेच्या हितासाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, एप्रिल 29, 2019 पर्यंत वैधता असलेले, वरील बँकेला दिलेले दि. ऑक्टोबर 26, 2018 रोजीचे निर्देश, एप्रिल 24, 2019 रोजीच्या निर्देशान्वये, वरील बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर, आणखी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी, म्हणजे, एप्रिल 30, 2019 ते ऑक्टोबर 29, 2019 पर्यंत लागु असणे सुरुच राहील.

(3) संदर्भित निर्देशांमधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. वरील मुदतवाढ दिलेल्या एप्रिल 24, 2019 रोजीच्या निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

(4) भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेला वरील बदल आणि/किंवा मुदतवाढ ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

शैलजा सिंग
उप महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2018-2019/2562

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?