<font face="mangal" size="3px">बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्),कलम 35अ अंतर् - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्),कलम 35अ अंतर्गत निर्देश - दि आर एस को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र
26 सप्टेंबर 2017 बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्),कलम 35अ अंतर्गत निर्देश - भारतीय रिझर्व्ह बँकेने, दिनांक 24 जून 2015 रोजी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने दि आर एस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र, वर दिनांक 26 जून 2015 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून, दिशा-निर्देश लादण्यात आले होते. निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आलेली होती किंवा सुधारित निर्देश देण्यात आलेले होते आणि ह्या निर्देशांची वैधता, दिनांक 20 मार्च 2017 च्या, निर्देशानुसार, निर्देशांचा कालावधी 25 सप्टेंबर 2017 पर्यंत वाढवण्यात आला होता जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन होता. जनतेच्या माहितीसाठी, सूचित करण्यात येते की दिनांक 24 जून 2015 व त्यानंतर दि आर एस को-ऑपरेटिव बॅंकेला वारंवार देण्यात आलेले निर्देश, दिनांक 20 सप्टेंबर 2017 च्या निर्देशानुसार चार महिन्यांपर्यंत 26 सप्टेंबर 2017 ते 25 जनवरी 2018 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल. दिनांक 20 सप्टेंबर 2017 च्या सुधारित आदेशाची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त बदलामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे. अजीत प्रसाद प्रेस प्रकाशनी: 2016-2017/840 |