RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78514596

बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली दिलेले निर्देश – दि आर एस को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र

जानेवारी 25, 2018

बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली दिलेले निर्देश –
दि आर एस को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र

दि आर एस को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, निर्देश दि. जून 24, 2015 अन्वये, जून 26, 2015 रोजीच्या व्यवहार बंद झाल्यापासून ह्या निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती, तसेच त्यात बदलही करण्यात आले होते (शेवटचे निर्देश दि. सप्टेंबर 20, 2017) आणि ते निर्देश, पुनरावलोकनाच्या अटीवर जानेवारी 25, 2018 पर्यंत वैध/लागु होते.

जनतेच्या हितासाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक, येथे निर्देश देत आहे की, दि आर एस को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना वेळोवेळी सुधारित केलेले, जून 24, 2015 रोजी दिलेले निर्देश (त्यांची वैधता, सप्टेंबर 20, 2017 रोजीच्या निर्देशाने, जानेवारी 25, 2018 पर्यंत वाढविण्यात आली होती), वरील बँकेला, निर्देश दि. जानेवारी 19, 2018 अन्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर, आणखी सहा महिन्यांसाठी, (म्हणजे, जानेवारी 26, 2018 ते जुलै 25, 2018 पर्यंत) लागु असणे सुरुच राहील.

जनतेच्या माहितीसाठी, दि. जानेवारी 19, 2018 च्या निर्देशाची एक प्रत, वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बदल केले ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेतला जाऊ नये.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2033

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?