RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78520959

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - युथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव बँक लि. कोल्हापुर, महाराष्ट्र

जुलै 5, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ खालील निर्देश - युथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव
बँक लि. कोल्हापुर, महाराष्ट्र

जानेवारी 5, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, युथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव बँक लि. कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना, निर्देश दि. जानेवारी 4, 2019 अन्वये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निर्देशांखाली ठेवण्यात आले होते व ते निर्देश, पुनरावलोकनाच्या अटीवर जुलै 5, 2019 पर्यंत वैध होते.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, वरील बँकेला दिलेले व जुलै 5, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले निर्देश दि. जानेवारी 4, 2019, वरील बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर, जुलै 2, 2019 च्या निर्देशांद्वारे, आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे जुलै 6, 2019 ते जानेवारी 5, 2020 पर्यंत लागु असणे सुरुच राहील.

संदर्भित निर्देशांमधील व इतर अटींमध्ये कोणताही बदल नाही. जनतेच्या माहितीसाठी निर्देश दि. जुलै 2, 2019 ची एक प्रत बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली मुदतवाढ आणि/किंवा बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/70

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?