बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 35 अ खालील निर्देश - हिंदु को-ऑपरेटिव बँक लि. पठाणकोट, पंजाब - मुदतवाढ
|
सप्टेंबर 27, 2019 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 35 अ खालील निर्देश - हिंदु को-ऑपरेटिव बँक लि. पठाणकोट, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, जनहितासाठी, हिंदु को-ऑपरेटिव बँक लि. पठाणकोट, पंजाब ह्यांना, मार्च 25, 2019 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निर्देशांखाली ठेवले होते. ह्या निर्देशांना आता काही बदलांसह मुदतवाढ देण्यात आली असून ते मार्च 24, 2020 पर्यंत लागु असतील. विस्तारित केलेल्या ह्या निर्देशांची प्रत, वरील बँकेचे मुख्य कार्यालय/शाखा/व्यवसायाच्या इतर सर्व कार्यालयात लावण्यात आली आहे. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2019-2020/801 |
पेज अंतिम अपडेट तारीख: