RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78495128

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ खालील निर्देश - दि सिटी को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ

ऑक्टोबर 17, 2018

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ खालील निर्देश - दि सिटी
को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र - मुदतवाढ

दि सिटी को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई ह्यांना, एप्रिल 17, 2018 रोजीच्या व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांसाठी, निर्देश दि. एप्रिल 17, 2018 अन्वये निर्देशांखाली ठेवण्यात आले होते.

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे निर्देशित करते की, वरील बँकेला एप्रिल 17, 2018 रोजी दिलेले निर्देश, ऑक्टोबर 15, 2018 रोजीच्या निर्देशान्वये, आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे ऑक्टोबर 18, 2018 ते एप्रिल 17, 2019 पर्यंत, पुनरावलोकनाच्या अटीवर लागु असतील.

वरील मुदतवाढ अधिसूचित करणा-या ऑक्टोबर 15, 2018 च्या निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित केली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने दिलेली वरील मुदतवाढ आणि/किंवा बदल ह्यांचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/910

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?