<font face="mangal" size="3px">बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - दि कराड जनता सहकारी बँक लि. कराड, महाराष्ट्र - कालावधीचा विस्तार
सप्टेंबर 10, 2019 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - दि कराड दि कराड जनता सहकारी बँक लि. कराड ह्यांना निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-1/डी-4/12.22.126/2017-18 दि. नोव्हेंबर 7, 2017 अन्वये, नोव्हेंबर 9, 2017 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. वरील निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती व शेवटचे निर्देश डीसीबीआर.सीओ.एआयडी/क्र.डी-36/12.22.126/2018-19 दि. मार्च 7, 2019 अन्वये, सप्टेंबर 9, 2019 पर्यंत वाढविण्यात आली होती. (2) जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित केले जाते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, शेवटून सप्टेंबर 9, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले व वेळोवेळी सुधारित केलेले, वरील बँकेस देण्यात आलेले निर्देश डीसीबीआर.सीओ.एआयडी/क्र.डी-36/12.22.126/2018-19 दि. मार्च 7, 2019 पुनरावलोकनाच्या अटीवर, निर्देश डीसीबीआर.सीओ.एआयडी/क्र.डी -13/ 12.22.126/2019-20 दि. सप्टेंबर 5, 2019 अनुसार, वरील बँकेला आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे सप्टेंबर 10, 2019 ते मार्च 9, 2020 पर्यंत लागु असतील. (3) संदर्भित निर्देशांच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. (4) सप्टेंबर 5, 2019 रोजीच्या, वरील मुदतवाढ करणा-या निर्देशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी, वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. (5) भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेली वरील मुदतवाढ आणि/किंवा केलेला बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2019-2020/658 |