RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78514653

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - युनायटेड को-ऑपरेटिव बँक लि. बागनान स्टेशन रोड (उत्तर) पो.ऑ. बागनान, जिल्हा - हावडा, पश्चिम बंगाल – मुदतवाढ

ऑक्टोबर 22, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश - युनायटेड को-ऑपरेटिव बँक
लि. बागनान स्टेशन रोड (उत्तर) पो.ऑ. बागनान, जिल्हा - हावडा, पिन - 711303, पश्चिम बंगाल – मुदतवाढ

भारतीय रिझर्व्ह बँकेने, जनतेच्या हिताच्या दृष्टीने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, युनायटेड को-ऑपरेटिव बँक लि. बागनान, पश्चिम बंगाल ह्यांना, जुलै 18, 2018 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून निर्देशांखाली ठेवले होते. व ते वेळोवेळी सुधारित करण्यात आले होते. आणि शेवटून ऑक्टोबर 18, 2019 पर्यंत विस्तारित करण्यात आले होते. जनतेच्या हितासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील निर्देशांना आणखी सहा महिन्यांची, म्हणजे, ऑक्टोबर 18, 2019 ते एप्रिल 18, 2020 पर्यंतची मुदतवाढ, पुनरावलोकनाच्या अटीवर दिली आहे. जनतेच्या माहितीसाठी, वरील निर्देशाची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने हे निर्देश दिले ह्याचा अर्थ, वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे असा घेतला जाऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक, तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशांमध्ये वेळोवेळी बदल करण्याचा विचार भारतीय रिझर्व्ह बँक करु शकते.

(योगेश दयाल)    
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/1001

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?