<font face="mangal" size="3">बँकिंग विनियमन अधिनियम (सहकारी संस्था म्हणू - आरबीआय - Reserve Bank of India
बँकिंग विनियमन अधिनियम (सहकारी संस्था म्हणून लागू), 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35ए अंतर्गत निदेश - नगर अर्बन को-ऑपरेटिव बैंक लिमिटेड, अहमदनगर
6 दिसंबर 2022 बँकिंग विनियमन अधिनियम (सहकारी संस्था म्हणून लागू), 1949 कलम 56 चे वाचन करीता, भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 06 डिसेंबर, 2021 रोजी दिलेल्या निर्देश सं. DoS.CO.SUCBs-West/S2399/12.22.159/2021-22 च्या अनुषंगाने नगर अर्बन को-ऑपरेटिव बैंक लिमिटेड, अहमदनगर वर दिनांक 06 डिसेंबर, 2021 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून सहा महीन्या पर्यंत दिशानिर्देश लादण्यात आले होते. या नियमावलीचा कालावधी वेळोवेळी वाढवण्यात आले असून 06 डिसेंबर, 2022 पर्यंत हे नियम लागू होते. 2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35A चे उप कलम (1) अनुसार, निहित अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की वरील दिशानिर्देशचा कालावधि हा दिनांक 06 डिसेंबर, 2022 च्या सुधारित निर्देश सं. DOR.MON.D-47/12.22.159/2022-23 द्वारा 06 मार्च, 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल. 3. संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी बदललेल्या नाहीत. दिनांक दिनांक 06 डिसेंबर, 2022 च्या सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या आवारात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे. 4. भारतीय रिझर्व बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व बँक समाधानी आहे. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशनी: 2022-2023/1316 |