RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78530096

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35A अंतर्गत निदेश - मराठा सहकारी बैंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र,- कालावधी वाढविणे

28 फेब्रुवारी 2023

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35A अंतर्गत निदेश - मराठा सहकारी
बैंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र,- कालावधी वाढविणे

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 31 ऑगस्ट, 2016 रोजी दिलेल्या निर्देश सं. DCBS.CO.BSD-I/D-4/12.22.141/2016-17 च्या अनुषंगाने मराठा सहकारी बैंक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र, वर दिनांक 31 ऑगस्ट, 2016 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून सहा महीन्या पर्यंत दिशानिर्देश लादण्यात आले होते. या नियमावलीचा कालावधी वेळोवेळी वाढवण्यात आला असून 28 फेब्रुवारी, 2023 पर्यंत हे नियम लागू होते.

2. जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35A चे उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिशानिर्देशचा कालावधि हा दिनांक 27 फेब्रुवारी, 2023 च्या सुधारित निर्देश सं. DOR.MON/D-80/12.22.140/2022-23 द्वारा 31 मे, 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे, जो बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.

3. संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी बदललेल्या नाहीत. दिनांक 27 फेब्रुवारी, 2023 च्या सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या आवारात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.

4. भारतीय रिझर्व बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व बँक समाधानी आहे.

(योगेश दयाल) 
मुख्य महाप्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2022-2023/1803

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?