RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78524182

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ खालील निर्देश - सिकर अर्बन को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. सिकर (राजस्थान) - वैधता कालावधीत वाढ

मे 10, 2019

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ खालील निर्देश - सिकर अर्बन
को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. सिकर (राजस्थान) - वैधता कालावधीत वाढ

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, सिकर अर्बन को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. सिकर (राजस्थान) ह्यांना दिलेल्या निर्देश दि. ऑक्टोबर 26, 2018 अन्वये वरील बँकेचे नोव्हेंबर 9, 2018 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यानंतर लागु असलेल्या वरील निर्देशांचा कार्यकारी कालावधी आणखी सहा महिन्यांनी वाढविला जाण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले आहे. त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे निर्देश देते की, सिकर अर्बन को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. सिकर (राजस्थान) ह्यांना दिलेले, ऑक्टोबर 21, 2018 रोजीचे निर्देश, मे 2, 2019 रोजीच्या निर्देशान्वये, त्या बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे, मे 10, 2019 ते नोव्हेंबर 9, 2019 पर्यंत लागु असतील.

संदर्भित निर्देशांमधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या ह्या निर्देशांचा अर्थ, रिझर्व्ह बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधासह करु शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशांमध्ये बदल करण्याचा विचार भारतीय रिझर्व्ह बँक करु शकते.

शैलजा सिंग
उप महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशनी : 2018-2019/2647

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?