RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78522455

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949, कलम 56 चे वाचन करीता, कलम 35अ अंतर्गत निर्देश कालावधी विस्तार-दी कराड़ जनता सहकारी बैंक लि., कराड़, महाराष्ट्र

8 मार्च 2019

बँकिंग विनियमन अधिनियम, 1949, कलम 56 चे वाचन करीता, कलम 35अ अंतर्गत निर्देश कालावधी विस्तार-
दी कराड़ जनता सहकारी बैंक लि., कराड़, महाराष्ट्र

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 7 नोव्हेंबर 2017 रोजी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने दी कराड़ जनता सहकारी बैंक लि., कराड़, महाराष्ट्र वर दिनांक 9 नोव्हेंबर 2017 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून सहा महिन्यांसाठी दिशानिर्देश लादण्यात आले होते. वरील निर्देशाची वैधता वेळोवेळी वाढवण्यात आली होती ज्यामध्ये दिनांक 30 ऑक्टोबर 2018 रोजी दिलेल्या निर्देशा अनुसार सहा महिन्यांसाठी अर्थात दिनांक 9 मार्च 2019 पर्यंत वाढविण्यात आली होती.

जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35अ, उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून उपरोक्त बँकेला असे निर्देश देत आहे की दिनांक 7 नोव्हेंबर 2017 रोजी दिलेल्या निर्देशची वैधता जी दिनांक 30 ऑक्टोबर 2018 च्या निर्देशा द्वारा वाढवण्यात आली होती ती वरील बँकेवर दिनांक 10 मार्च 2019 ते 9 सप्टेंबर 2019 पर्यंत सहा महिन्यांसाठी लागू असेल.

संदर्भाधीन निर्देशातील इतर कोणत्याही नियम आणि अटी बदललेल्या नाहीत.

वरील वैधता सूचित करणारे दिनांक 7 मार्च 2019 च्या सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या आवारात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढी मुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे.

अनिरुद्ध डी. जाधव
सहायक प्रबंधक

प्रेस प्रकाशनी: 2018-2019/2138

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?