<font face="mangal" size="3">काऊंटर्सवर एसबीएनची अदलाबदल खंडित करणे</font> - आरबीआय - Reserve Bank of India
काऊंटर्सवर एसबीएनची अदलाबदल खंडित करणे
आरबीआय/2016-17/155 नोव्हेंबर 24, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, महोदय काऊंटर्सवर एसबीएनची अदलाबदल खंडित करणे कृपया, रु.500 व रु.1000 च्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे -काऊंटर्सवरील अदलाबदल ह्या विषयावरील आमचे परिपत्रक डीसीएम (पीएलजी) क्र. 1302/10.27.00/2016-17 दि. नोव्हेंबर 17, 2016 चा संदर्भ घ्यावा. (2) पुनरावलोकन केल्यानंतर असे ठरविण्यात आले आहे की, नोव्हेंबर 24, 2016 च्या मध्यरात्री नंतर, एसबीएनची (रोख) काऊंटर्सवरुन अदलाबदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही. ह्या एसबीएन काऊंटर्सवरुन बदलून घेण्यास आलेल्या जनतेला, त्या एसबीएन, त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी प्रोत्साहित केले जावे. (3) बँकेत खाते नसलेल्या लोकांसाठी त्यांना नवीन खाती उघडण्याची सुविधा दिली जाण्याबाबत खात्री केली जावी. आपली विश्वासु (पी विजया कुमार) |