<font face="mangal" size="3px">नोव्हेंबर 10 ते डिसेंबर 19, 2016 दरम्यान बँक नोटांचे  - आरबीआय - Reserve Bank of India
नोव्हेंबर 10 ते डिसेंबर 19, 2016 दरम्यान बँक नोटांचे वितरण
डिसेंबर 21, 2016 नोव्हेंबर 10 ते डिसेंबर 19, 2016 दरम्यान बँक नोटांचे वितरण नोव्हेंबर 8, 2016 च्या मध्यरात्रीपासून, रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकल्यानंतर, भारतीय रिझर्व बँकेने, बँकांच्या मार्फत जनतेला, निरनिराळ्या मूल्यांमधील बँक नोटांचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी व्यवस्था केली. नोव्हेंबर 10, 2016 ते नोव्हेंबर 19, 2016 ह्या कालावधीत, काऊंटर्सवरुन किंवा एटीएम मधून रु.5,92,613 करोड मूल्याच्या नोटा जनतेला दिल्या गेल्याचे बँकांकडून कळविण्यात आले आहे. ह्या कालावधीत, रिझर्व बँकेने, बँकांना व त्यांच्या शाखांना, जनतेमध्ये वितरण करण्यासाठी, निरनिराळ्या मूल्यांच्या एकूण 22.6 बिलियन नोटा दिल्या होत्या. त्यापैकी 20.4 बिलियन नोटा ह्या, रु.10, 20, 50 व 100 अशा छोट्या मूल्यांच्या होत्या आणि 2.2 बिलियन नोटा, रु.2000 व रु.500 अशा मोठ्या मूल्याच्या होत्या. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1602 |