RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78493521

रु.500/- व रु.1000/- मूल्याच्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे बदलून देण्याची सुविधा – गैरवापर केल्याचे अहवाल - जनतेला सावधानतेचा इशारा

नोव्हेंबर 22, 2016

रु.500/- व रु.1000/- मूल्याच्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे
बदलून देण्याची सुविधा – गैरवापर केल्याचे अहवाल - जनतेला सावधानतेचा इशारा

घोषणा केल्याच्या तारखेस विहित बँक नोटा (रु.500 व रु.1000 च्या जुन्या नोटा) जवळ असलेल्या जनतेला ह्या नोटांचे मूल्य, अदलाबदल करुन किंवा बँक खात्यात जमा करुन त्यांना वैध चलन स्वरुपात मिळावे ह्यासाठी, त्या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा कितीही संख्येने बँक खात्यात जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

असे कळविण्यात आले आहे की, काही भोळ्या व्यक्ती इतरांच्या वतीने ह्या नोटा बदलून घेत आहेत आणि काही व्यक्ती तर, बेकायदा साठविलेली रोकड त्यांच्या स्वतःच्या खात्यात जमा करुन त्यांना मदतच करत आहेत. ह्यासाठी, प्रधान मंत्री जनधन योजना खात्यांचाही वापर केला जात आहे.

जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे की, अनधिकृत रितीने, विहित बँक नोटा बदलून घेणे/हाताळणे हे बेकायदेशीर असून त्यासाठी कडक दंडात्मक कारवाई होऊ शकते.

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1283

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?