<font face="mangal" size="3">विदेशी नागरिकांसाठी अदलाबदलीची सुविधा</font> - आरबीआय - Reserve Bank of India
विदेशी नागरिकांसाठी अदलाबदलीची सुविधा
आरबीआय/2016-17/208 जानेवारी 03, 2017 सर्व प्राधिकृत व्यक्ती महोदय/महोदया, विदेशी नागरिकांसाठी अदलाबदलीची सुविधा प्राधिकृत व्यक्तींचे लक्ष, एपी (डीआयआर) मालिका परिपत्रक क्र. 20 दि. नोव्हेंबर 25, 2016 कडे वेधण्यात येत आहे. ह्या परिपत्रकामध्ये, विदेशातील नागरिकांना, प्रति सप्ताह, रु.5,000/- पर्यंत रकमेच्या भारतीय बँक नोटा, डिसेंबर 15, 2016 पर्यंत बदलून देण्यास परवानगी देण्यात आली होती आणि त्यानंतर एपी (डीआयआर) मालिका परिपत्रक 22, दि. डिसेंबर 16, 2016 अन्वये ही मुदत डिसेंबर 31, 2016 पर्यंत वाढविण्यात आली होती. (2) पुनरावलोकन केल्यानंतर ठरविण्यात आले की, एपी (डीआयआर मालिका) परिपत्रक क्र.20, दि. नोव्हेंबर 25, 2016 मधील सूचना, जानेवारी 31, 2016 पर्यंतही जारी असतील. (3) प्राधिकृत व्यक्तींनी वरील सूचनांचे अनुसरण करुन ह्या सूचना त्यांच्या ग्राहकांच्या नजरेस आणाव्यात. (4) ह्या परिपत्रकात दिलेले निदेश, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 (1999 चा 42) च्या कलम 10(4) व कलम 11(1) खाली देण्यात आले आहेत. आणि ते इतर कोणत्याही कायद्याखाली आवश्यक असलेल्या परवानग्या/मंजुरीच्या बाधा आणणारे नाहीत. आपला विश्वासु (शेखर भटनागर) |