<font face="mangal" size="3">वसंतदादा नागरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद, महा&# - आरबीआय - Reserve Bank of India
वसंतदादा नागरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद, महाराष्ट्र ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना मुदतवाढ
सप्टेंबर 18, 2019 वसंतदादा नागरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद, महाराष्ट्र ह्यांना देण्यात आलेल्या निर्देशांना मुदतवाढ बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, जनहिताच्या दृष्टीने, वसंतदादा नागरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद, महाराष्ट्र ह्यांना, नोव्हेंबर 13, 2017 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून निर्देश दिले होते व ते निर्देश त्यानंतर सप्टेंबर 13, 2019 पर्यंत वाढविण्यात आले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने आता ह्या निर्देशाचा कालावधी आणखी एक महिन्याने, म्हणजे, सप्टेंबर 14, 2019 ते ऑक्टोबर 13, 2019 पर्यंत वाढविला आहे. ह्या निर्देशांमध्ये ठेवींच्या स्वीकार/निकासी ह्यावर काही निर्बंध आणि/किंवा मर्यादा घालण्यात आल्या आहेत. संबंधित जनतेच्या माहितीसाठी सविस्तर निर्देश वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आले आहेत. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व्ह बँक करु शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने हे निर्देश दिले ह्याचा अर्थ, भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2019-2020/724 |