<font face="mangal" size="3">बाह्य वाणिज्य कर्जे घेणे (ईसीबी) धोरण - सूचिबध् - आरबीआय - Reserve Bank of India
बाह्य वाणिज्य कर्जे घेणे (ईसीबी) धोरण - सूचिबध्द नसलेले ईसीबी उत्पन्न मुदत ठेवींमध्ये ठेवण्याच्या (पार्किंग) कालावधीत शिथिलता
आरबीआय/2021-22/16 एप्रिल 07, 2021 प्रति, सर्व श्रेणी-I अधिकृत विक्रेते बँका महोदय/महोदया, बाह्य वाणिज्य कर्जे घेणे (ईसीबी) धोरण - सूचिबध्द नसलेले ईसीबी उत्पन्न मुदत ठेवींमध्ये ठेवण्याच्या (पार्किंग) कालावधीत शिथिलता कृपया, विकासात्मक व विनियामक धोरणांवरील, एप्रिल 7, 2021 रोजीच्या गव्हर्नरांच्या निवेदनाच्या परिच्छेद 12 चा संदर्भ घ्यावा. ह्या संबंधात, प्राधिकृत डीलर वर्ग - 1 (एडी वर्ग - 1) बँकांचे लक्ष, ‘बाह्य वाणिज्य कर्जे, ट्रेड क्रेडिट्स व स्ट्रक्चर्ड ऑब्लिगेशन्स’ ह्यावरील महानिर्देश क्र.5 दि. मार्च 26, 2019, च्या परिच्छेद 4.2 कडे वेधण्यात येत आहे. ह्या महानिर्देशानुसार, ईसीबी कर्जदारांना, ईसीबीचे उत्पन्न, संचयित रीत्या कमाल 12 महिन्यांसाठी, एडी वर्ग 1 बँकांमध्ये मुदत ठेवी म्हणून ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. (2) औद्योगिक संघांसह स्टेकहोल्डर्सकडून आलेल्या विनंत्यांवर आधारित, आणि कोविड-19 साथीमुळे बाधित झालेल्या ईसीबी कर्जदारांना मदत देण्याच्या विचाराने एकच वेळा करावयाचा उपाय म्हणून वरील अट शिथिल करावयाचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, मार्च 1, 2020 रोजी किंवा त्यापूर्वी काढलेले (ड्रॉन डाऊन) अधिसूचित नसलेले ईसीबी उत्पन्न, मार्च 1, 2022 पर्यंतच्या अतिरिक्त कालावधीसाठी, भारतामधील एडी वर्ग - 1 बँकांमध्ये मुदत ठेवींमध्ये ठेवता येऊ शकते. (3) ह्या ईसीबी धोरणातील इतर सर्व तरतुदींमध्ये कोणताही बदल नाही. एडी वर्ग - 1 बँकांनी ह्या परिपत्रकातील मजकुर त्यांच्या घटकांच्या/ग्राहकांच्या नजरेस आणावा. (4) वरील महानिर्देश क्र.5 दि. मार्च 26, 2019, मध्ये हे बदल करुन ते अद्यावत करण्यात येत आहे. (5) ह्या परिपत्रकातील निर्देश/सूचना विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम 1999 च्या (1999 चा 42) कलम 10(4) व कलम 11(2) खाली देण्यात आल्या असून त्या अन्य कोणत्याही कायद्याखाली आवश्यक असलेल्या (असल्यास) परवानग्या/मंजुरींच्या विपरीत नाहीत. आपला विश्वासु, (अजय कुमार मिश्रा) |