<font face="mangal" size="3">भारताबाहेर निवासी असलेल्या व्यक्तींसाठी सु - आरबीआय - Reserve Bank of India
भारताबाहेर निवासी असलेल्या व्यक्तींसाठी सुविधा - स्पष्टीकरण
आरबीआय/2013-14/454 जानेवारी 20, 2014 सर्व वर्ग 1 प्राधिकृत डीलर बँका महोदय/महोदया, भारताबाहेर निवासी असलेल्या व्यक्तींसाठी सुविधा - स्पष्टीकरण प्राधिकृत डीलर्स वर्ग 1 (एडी वर्ग 1) बँकांचे लक्ष, विदेशी मुद्रा व्यवस्थापन (विदेशी मुद्रेतील डेरिवेटिव कंत्राटे) विनियम, 2000 दि. मे 3, 2000 (अधिसूचना क्र. फेमा/25/आरबी-2000) आणि एपी (डीआयआर सिरीज)परिपत्रक क्र. 45 दि. ऑक्टोबर 22, 2012 कडे वेधण्यात येत आहे. ह्यात सांगण्यात आले होते की, विदेशी संस्थात्मक निवेशकांना, (एफआयआआय) एखाद्या विशिष्ट दिवशी, त्यांच्या इक्विटी आणि/किंवा भारतामधील कर्जातील गुंतवणुकीच्या मूल्यावरील चलन जोखमीचे हेजिंग करण्यास, त्यात दिलेल्या अटींवर, एडी वर्ग 1 बँकांकडे जाण्यास परवानगी आहे. (2) आमच्याकडे मार्केटमध्ये भाग घेणारांकडून विचारणा केल्या जात आहेत की, इतरांप्रमाणेच, एफआयआय व इतर विदेशी निवेशकांना नेमस्त एडी वर्ग 1 कस्टडियन बँक सोडून अन्य बँकेमध्ये, रोख/टी ओ एम/स्पॉट धर्तीवर प्रेषणे करता येणे शक्य आहे काय ह्याबाबत येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, विदेशी निवेशक, फेमा 1999 किंवा त्याखाली केलेल्या विनियम/निदेशांखाली परवानगी असलेल्या कोणत्याही व्यवहाराबाबतचे प्रेषण, त्यांच्या पसंतीच्या बँकेमार्फत करण्यास स्वतंत्र आहेत. अशा प्रकारे प्रेषण केलेला निधी, बँकिंग चॅनल्समधून, नेमलेल्या एडी वर्ग 1 बँकेमध्ये हस्तांतरित केला जाऊ शकतो. तथापि, येथे नोंद घेतली जावी की, प्रेषणर्कत्यासंबंधीचा केवायसी करणे (आवश्यक तेथे) ही, प्रेषण स्वीकारणारी बँक आणि त्या प्रेषणाची रक्कम शेवटी मिळालेली बँक ह्यांचीच संयुक्त जबाबदारी असेल. पहिली बँक ही त्या प्रेषणर्कत्याची माहिती व प्रेषणाच्या हेतूबाबत जबाबदार असेल, तर दुसरी बँक प्राप्तर्कत्याबाबतच्या संपूर्ण माहितीसाठी जबाबदार असेल. ह्याशिवाय, तो निधी विदेशी मुद्रेतच प्रेषण करण्यात आला होता हे सिध्द करण्यासाठी, प्रेषण स्वीकारणा-या बँकेने, त्या प्रेषणाचे उत्पन्न मिळविणा-या बँकेकडे एफआयआरसी देणे आवश्यक आहे. (3) आमच्या एपी (डीआयआर सिरीज)परिपत्रक क्र. 45 दि. ऑक्टोबर 22, 2012 मधील सर्व अटी बदलांसह लागु होतील. (4) एडी वर्ग 1 बँकांनी ह्या परिपत्रकातील मजकूर त्यांच्या ग्राहकांच्या नजरेस आणावा. (5) ह्या परिपत्रकातील निदेश, विदेशी मुद्रा व्यवस्थापन अधिनियम, 1999 च्या (1999 चा 42) कलम 10(4) व कलम 11 (1) खाली देण्यात आला असून तो, इतर कोणत्याही कायद्याखाली आवश्यक असलेल्या परवानग्या/मंजुरींच्या विपरीत नाही. आपला (रुद्र नारायण कार) |