<font face="mangal" size="3">पृथ्वी क्रेडिट सहकारी सोसायटी लिमिटेड (बहुर - आरबीआय - Reserve Bank of India
पृथ्वी क्रेडिट सहकारी सोसायटी लिमिटेड (बहुराज्यीय) लखनौ ह्यांच्या वेबसाईटवरील खोटी व दिशाभूल करणारी निवेदने
जून 14, 2017 पृथ्वी क्रेडिट सहकारी सोसायटी लिमिटेड (बहुराज्यीय) लखनौ भारतीय रिझर्व बँकेच्या नजरेस आले आहे की, रिझर्व बँकेचे पत्र क्रमांक एलके.डीसीबीएस.1391/10.10.016/2016-17 दि. फेब्रुवारी 8, 2017 मधील मजकुराचा विपर्यास करुन, बहुराज्यीय पृथ्वी क्रेडिट सहकारी सोसायटी लि. चे बहुराज्यीय सहकारी बँकेमध्ये रुपांतरण करण्यास आरबीआयने नाहरकत दिली असल्याबाबत, वरील सोसायटी तिच्या http://prithvisociety.com वेबसाईटवर खोटी निवेदने प्रदर्शित करुन जनतेची दिशाभूल करत आहे. सर्वसाधारण जनतेच्या नजरेस आणण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व बँकेने, वरील बहुराज्यीय पृथ्वी क्रेडिट सहकारी सोसायटी लि. ह्यांचे, बहुराज्यीय सहकारी बँकेत रुपांतरण करण्याबाबत कोणतेही नाहरकत पत्र दिलेले नाही. ह्याशिवाय, भारतीय रिझर्व बँकेने वरील सोसायटीलाही कळविले आहे की, तिने त्या सोसायटीच्या वेबसाईटवरील खोटा व दिशाभूल करणारी निवेदने/घोषणा ताबडतोब काढून टाकावी/खोडून टाकावी, आणि वास्तव व खरी स्थिती स्पष्ट करणारे शुध्दीपत्र द्यावे. वरील सोसायटीच्या वेबसाईटवरील खोट्या व दिशाभूल करणा-या मजकुराला बळी पडण्यापासून जनतेला सावध करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेकडून ती नोटिस देण्यात येत आहे. अनिरुध्द डी जाधव वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3376 |