<font face="mangal" size="3">अर्थ मंत्री व आरबीआयच्या केंद्रीय मंडळाच्यì - आरबीआय - Reserve Bank of India
अर्थ मंत्री व आरबीआयच्या केंद्रीय मंडळाच्या संचालकांची भेट संपन्न
फेब्रुवारी 11, 2017 अर्थ मंत्री व आरबीआयच्या केंद्रीय मंडळाच्या संचालकांची भेट संपन्न श्री. अरुण जेटली, माननीय अर्थ मंत्री ह्यांनी आज नवी दिल्लीमध्ये प्रथेनुसार भारतीय रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या संचालकांच्या सभेमध्ये अंदाजपत्रकोत्तर भाषण केले. ह्या भाषणात, माननीय अर्थ मंत्र्यांनी, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) व लघु व मध्यम उद्योग (एसएमई) क्षेत्रासाठीचे कर कमी करणे ह्या व्यतिरिक्त, आर्थिक शिस्त ठेवण्याच्या पायावरच पुढे चालत राहतांना, ग्रामीण क्षेत्र, गृहनिर्माण व पायाभूत सोयी ह्यावरच अंदाजपत्रक केंद्रित असण्यावर भर दिला. वरील मंडळाने अंदाजपत्रकाबाबत अर्थमंत्र्यांची प्रशंसा केली. केंद्रीय अर्थ मंत्र्यांबरोबर श्री. अरुण राम मेघवाल, वित्त विभागाचे राज्य मंत्रीही आले होते. ह्या सभेमध्ये, श्री. अशोक लवासा, वित्त विभागाचे सचिव, डॉ. हसमुख अधिया, सचिव (राजस्व), श्री. नीरज कुमार गुप्ता, सचिव (निवेश व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन), आणि डॉ. अरविंद सुब्रम्हण्यम, मुख्य आर्थिक सल्लागार हे देखील उपस्थित होते. केंद्रीय मंडळाच्या 563 व्या सभेचे अध्यक्षपद गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांनी भूषविले होते व भारतीय रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर्स, श्री. आर गांधी, श्री. एस एस मुंद्रा, श्री. एन एस विश्वनाथन ह्यांच्या व्यतिरिक्त, ह्या सभेमध्ये केंद्रीय मंडळाचे संचालक, श्री. नटराजन चंद्रशेखरन, श्री. भारत दोशी, श्री. सुधीर मनकड, डॉ. राजीव कुमार, डॉ. अशोक गुलाटी आणि श्री. मनीष साबरवालही उपस्थित होते. त्याचप्रमाणे, श्री. शक्तिकांत दास, सचिव आर्थिक कार्य विभाग आणि कु. अंजली छिब दुग्गल, सचिव वित्तीय सेवा विभाग हे सरकारकडून नामनिर्देशित संचालकही उपस्थित होते. ह्या सभेमध्ये विद्यमान आर्थिक स्थिती, जागतिक व देशांतर्गत आव्हाने आणि भारतीय रिझर्व बँकेची इतर विशिष्ट क्षेत्रे ह्यांचा आढावा घेण्यात आला. जोस जे.कित्तूर वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2166 |