<font face="mangal" size="3">वित्तीय कारवाई कृती दल (एफएटीएफ) सार्वजनिक नि&# - आरबीआय - Reserve Bank of India
वित्तीय कारवाई कृती दल (एफएटीएफ) सार्वजनिक निवेदन दि. ऑक्टोबर 19, 2018
जानेवारी 03, 2019 वित्तीय कारवाई कृती दल (एफएटीएफ) सार्वजनिक निवेदन दि. ऑक्टोबर 19, 2018 वित्तीय कारवाई कृती दलाने (एफएटीएफ) तिच्या सभासदांना व इतर अधिकार क्षेत्रांना सांगितले आहे की त्यांनी, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाच्या (डीपीआरके) अधिकार क्षेत्रातून सातत्याने व लक्षणीयतेने निर्माण होत असलेल्या मनी लाँडरिंग व टेररिस्ट फायनान्सिंगच्या (एमल/एफटी) धोक्यांपासून आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणालीचे संरक्षण करण्यासाठी, प्रतिउपाय लागु करावेत. अशा अधिकार/कार्य क्षेत्रांपासून निर्माण होणा-या धोक्यांच्या प्रमाणात अधिकतर प्रयास/कष्ट घेऊन उपाय करण्यासाठी इराणच्या अधिकार क्षेत्रातील सभासदांना असा एफएटीएफ इशारा (कॉल) देणे आवश्यक आहे. एफएटीएफने पुढील अधिकारक्षेत्रे निवडली/ओळखली आहेत की जेथे आणीबाणीच्या त्रुटींमुळे, त्यांचा सामना करण्यासाठी, एफएटीएफ बरोबर एक कृती योजना तयार केली आहे. ही अधिकारक्षेत्रे म्हणजे, बहमास, बोत्सवाना, इथियोपिया, घाना, पाकिस्तान, सर्बिया, श्रीलंका, सिरिया, त्रिनिदाद व टोबॅगो, ट्युनिशिया आणि येमेन. ही माहिती, एफएटीएफने, ऑक्टोबर 19, 2018 रोजी वितरित केलेल्या अद्यावत सार्वजनिक निवेदनात व पत्रकात उपलब्ध आहे. हे निवेदन व पत्रक पुढील युआरएलमध्ये अॅक्सेस केले जाऊ शकते – व अँटी मनी लाँडरिंग (एएमएल)/दहशतवादाला वित्तसहाय्याशी सामना (सीएफटी) मध्ये आणीबाणीच्या त्रुटी असलेली अधिकारक्षेत्रे ओळखून त्यांच्याबरोबर काम करण्याच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एफएटीएफ प्लेनरी, ‘इंप्रुव्हिंग ग्लोबल कंप्लायन्स : ऑन गोईंग प्रोसेस’ ह्या शीर्षकाचे एक सार्वजनिक निवेदन व पत्रक वितरित करीत असते. हे निवेदन व पत्रक एफएटीएफच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यात निर्देशित केलेल्या देशांशी व अधिकारक्षेत्रांशी व्यावसायिक व्यवहार व कायदेशीर व्यापार करण्यासाठी, विनियमित संस्थांना प्रतिबंध नाही. एफएटीएफ संबंधाने वित्तीय कारवाई कृती दल (एफएटीएफ) ही तिच्या सभासद अधिकारक्षेत्रांच्या मंत्र्यांनी, 1989 साली स्थापन केलेली एक आंतर-सरकार संस्था आहे. एफएटीएफची उद्दिष्टे म्हणजे, आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीच्या एकात्मतेला असलेल्या मनी लाँडरिंग, दहशतवादाला अर्थसहाय्य, व इतर आव्हाने/धोके ह्यांच्याशी सामना करण्यासाठी मानके निश्चित करणे आणि कायदेशीर, विनियामक कार्यकारी उपायांची अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहन देणे. आवश्यक त्या उपायांची अंमलबजावणी करण्यातील प्रगतीवर एफएटीएफ देखरेख करते, मनी लाँडरिंग व दहशतवाद्यांना अर्थ सहाय्य करण्याच्या तंत्रांचे व प्रति-उपायांचा आढावा घेते आणि जागतिक दृष्टीने सुयोग्य उपाय व त्यांची अंमलबजावणी ह्यांना प्रोत्साहन देते. एफएटीएफ प्लेनरी ही एफएटीएफची निर्णय घेणारी संस्था/सभा वर्षातून तीन वेळा आयोजित केली जाते आणि येथे नोंद घ्यावी की निवेदनेही अद्यावत करते. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1548 |