<font face="mangal" size="3px">एफएलसी (वित्तीय साक्षरता केंद्रे) व ग्रामीण श - आरबीआय - Reserve Bank of India
एफएलसी (वित्तीय साक्षरता केंद्रे) व ग्रामीण शाखांद्वारे वित्तीय साक्षरता - निधी देण्यामधील मर्यादांमधील सुधारणा, दृक-श्राव्य मजकुर व हँड हेल्ड प्रोजेक्टर्स उपलब्ध करणे.
आरबीआय/2017-18/23 जुलै 13, 2017 अध्यक्ष/एमडी व सीईओ, महोदय/महोदया, एफएलसी (वित्तीय साक्षरता केंद्रे) व ग्रामीण शाखांद्वारे वित्तीय साक्षरता - निधी देण्यामधील मर्यादांमधील सुधारणा, दृक-श्राव्य मजकुर व हँड हेल्ड प्रोजेक्टर्स उपलब्ध करणे. कृपया, एफएलसी व बँकांच्या ग्रामीण शाखांसाठी असलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या धोरणात्मक आढाव्यावरील आमचे परिपत्रक एफआयडीडी.एफएलसी.बीसी.क्र.22/12.01.018/2016-17 दि. मार्च 2, 2017 चा संदर्भ घ्यावा. ह्या परिपत्रकांनुसार, बँकांना सांगण्यात आले होते की, वित्तीय शिबिरे आयोजित करण्यासाठीच्या खर्चाच्या 60% निधी (प्रति शिबिर कमाल रु.15,000/- पर्यंत), वित्तीय समावेशन निधीमधून मिळविण्यासाठी, एफएलसी व ग्रामीण शाखा पात्र आहेत. (2) पुनरावलोकन केल्यानंतर, एफआयएफ सल्लागार मंडळाने, सुधारणा करुन, बँकांना उपलब्ध असलेला सहाय्यक निधी शिबिराच्या खर्चाच्या 60% व प्रतिशिबिर कमाल रु.5,000/- केला आहे. अधिक माहितीसाठी बँकांनी, नाबार्डने दिलेले परिपत्रक 107/ डीएफआयबीटी -24/2017 दि. मे. 4, 2017 चा संदर्भ घ्यावा. (3) दृक-श्राव्य मजकुर व हँड हेल्ड प्रोजेक्टर्स - वित्तीय साक्षरता शिबिरांची परिणामकारकता वाढविण्यासाठी, वित्तीय जाणीव संदेशावरील दृक-श्राव्य मजकुर दाखविण्यासाठी हँड हेल्ड प्रोजेक्टर्स व पोस्टर्सचा उपयोग करण्यासाठी, एफएलसी व बँकांच्या ग्रामीण शाखांना प्रोत्साहन देण्याचे ठरविण्यात आले आहे. एफ आय एफ कडून हँड हेल्ड प्रोजेक्टर्स व स्पीकर्स साठीचा निधी, हँड हेल्ड प्रोजेक्टर्स व स्पीकर्सच्या (दोन्हीही मिळून) खरेदीच्या किंमतीच्या 50%पर्यंत, प्रति ग्रामीण शाखा/एफएलसी साठी कमाल रु. 5,000/- प्रतिपूर्तीच्या धर्तीवर देण्यात येईल. अशा निधीबाबतच्या अधिक माहितीसाठी बँकांनी, नाबार्डचे परिपत्रक क्र. 105/डीएफआयबीटी-22/2017 दि.मे 4, 2017 चा संदर्भ घ्यावा. (4) ह्याशिवाय, वित्तीय क्षेत्रातील नियंत्रकांनी सहाय्य केलेल्या वित्तीय साक्षरता राष्ट्रीय केंद्राने (एनसीएफई), आरबीआयने उपलब्ध केलेल्या वित्तीय जाणीव संदेशांवरील दृक-श्राव्य तयार केली आहेत. ह्यामधील पहिल्याच दृक-श्राव्यामध्ये, केवायसी नॉर्म्स खाली पत्त्याचा पुरावा घोषित करणे, व्यवसाय प्रतिनिधींचा उपयोग, एनईएफटी/आरटीजीएस सारखा इलेक्ट्रॉनिक प्रदान प्रणाली, खोट्या ई मेल्स/कॉल्स व पाँझी योजनांना बळी न पडणे ह्यासारख्या, वित्तीय जाणीव संदेशांचा समावेश आहे. दुस-या दृक-श्राव्यामध्ये, भीममार्फत युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा वापर करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली असून, तिस-या दृक-श्राव्यामध्ये, डिजिटल व रोकड विहीन (कॅशलेस) व्यवहार करण्याचे निरनिराळे मार्ग समजावले आहेत. वित्तीय साक्षरता शिबिरे चालवितांना वरील दृक-श्राव्यांचा वापर करण्यासाठी एफएलसी व ग्रामीण शाखांना सांगण्यात येत आहे. आपली विश्वासु, उमा शंकर |