<font face="mangal" size="3">वित्तीय साक्षरता साहित्य</font> - आरबीआय - Reserve Bank of India
वित्तीय साक्षरता साहित्य
मार्च 10, 2017 वित्तीय साक्षरता साहित्य सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी पायाभूत वित्तीय साक्षरता संदेश उपलब्ध करुन देण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेने, फेम (एफएएमई - फायनानशियल अवेअरनेस मेसेजेस) नावाची एक पुस्तिका प्रसिध्द केली आहे. ह्या पुस्तिकेत संस्था/उत्पाद निरपेक्ष असे, वित्तीय साक्षरता बाबतचे अकरा संदेश. उदा.- बँक खाते उघडताना सादर करावयाचे कागदपत्र (केवायसी), अंदाजपत्रक तयार करणे, बचत करणे व जबाबदारी ठेवून कर्ज घेणे, कर्जाची परतफेड वेळेवारी करुन चांगला कर्जविषयक दर्जा ठेवणे, अगदी दारात किंवा घराच्या जवळपासच बँक व्यवहार करणे, बँकेकडे किंवा बँकिंग लोकपालाकडे तक्रार कशी करावी हे जाणून घेणे, इलेक्ट्रॉनिक प्रेषणांचा उपयोग समजून घेणे, केवळ पंजीकृत असलेल्या संस्थांमध्येच पैसा गुंतवणे, इत्यादि. ह्या उपक्रमाचा उद्देश म्हणजे, वित्तीय उत्पाद व सेवा, चांगल्या वित्तीय रीती, डिजिटल व्यवहार करणे आणि ग्राहक सुरक्षा ह्याबाबत जाणीव निर्माण करणे. ही पुस्तिका स्थानिक भाषांमध्ये डाऊनलोड करण्यासाठी (/en/web/rbi/financial-education/downloads/financial-awareness-messages). येथे उपलब्ध आहे. युपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) आणि *99#(अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा) वरील दोन स्थानिक भाषांमधील दोन पोस्टर्सही डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2426 |