<font face="mangal" size="3">वित्तीय साक्षरता सप्ताह 2019</font> - आरबीआय - Reserve Bank of India
वित्तीय साक्षरता सप्ताह 2019
मे 31, 2019 वित्तीय साक्षरता सप्ताह 2019 दर वर्षी केंद्रीकृत अशा मोहिमेद्वारे, महत्वाच्या विषयांबाबत जाणीव निर्माण करण्यासाठी, वित्तीय साक्षरता सप्ताह हा आरबीआयने घेतलेला एक पुढाकार आहे. हा वित्तीय साक्षरता सप्ताह जून 3-7 पासून, ‘शेतकरी’ ह्या विषयावर व औपचारिक बँकिंग प्रणालीचा तो एक भाग झाल्याने त्यांना कसा लाभ होतो ह्यावर आयोजित करण्यात आला आहे. सर्वंकष अशा आर्थिक विकासासाठी शेतीचा विकास होणे आवश्यक असून त्यासाठी वित्त हे अत्यावश्यक आहे. शेतकरी समाजासाठीचा कर्जप्रवाह वाढविणारी धोरणे तयार करण्यात आरबीआयचा सक्रिय भाग आहे. अलिकडील वर्षांमध्ये कर्ज देण्याची यंत्रणा सशक्त करण्यासाठी व वित्तीय समावेशनासाठी ह्या बँकेने अनेक पुढाकार घेतले आहेत. शेतकरी समाजात जाणीव निर्माण करुन वित्तीय साक्षरतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी, हा केंद्रीकृत संदेश प्रसारित करण्यासाठी पोस्टर्स व पत्रके तयार करण्यात आली आहेत. ग्रामीण क्षेत्रातील बँक शाखा, वित्तीय साक्षरता केंद्रे एटीएम्स व वेबसाईट्स ह्यावरही ही पोस्टर्स व मजकुर प्रदर्शित करण्यासाठी बँकांना सांगण्यात आले आहे. ह्याशिवाय, शेतक-यांमध्ये आवश्यक ते वित्तीय जाणीव संदेश प्रसारित करण्यासाठी, जून महिन्यामध्ये, आरबीआय, दूरदर्शन व भारतीय आकाशवाणीवर, मोठी समाज-माध्यम मोहिम सुरु करील. शेतकरी समाजापर्यंत पोहोचण्याचा आरबीआयचा उद्देश असून सर्व भागधारकांना विनंती केली जात आहे की, त्यांनी ही वित्तीय साक्षरता मोहीम यशस्वी करावी. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2018-2019/2816 |