पश्चिम बंगाल राज्यांमध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती – लीड बँकेची जबाबदारी सोपविणे
|
आरबीआय/2017-18/60 सप्टेंबर 21, 2017 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय/महोदया, पश्चिम बंगाल राज्यांमध्ये नवीन जिल्ह्यांची निर्मिती – पश्चिम बंगाल सरकारने राजपत्र अधिसूचना दि. मार्च 20, 2017 अन्वये, पश्चिम बंगाल राज्यात, एप्रिल 4, 2017 पासून ‘झारग्राम’ हा नवीन जिल्हा निर्माणे केल्याचे आणि राजपत्र अधिसूचना दि. मार्च 24, 2017 अन्वये, एप्रिल 7, 2017 पासून ‘पश्चिम बर्धमान’ हा नवीन जिल्हा निर्माण केल्याचे अधिसूचित केले होते. ह्या नवीन जिल्ह्यांच्या लीड बँकेची जबाबदारी खाली दिल्यानुसार ठरविण्यात आली आहे.
(2) नव्या जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड्स, बँकांतील बीएसआर अहवालातही देण्यात आले आहेत. (3) पश्चिम बंगाल राज्यामधील इतर जिल्ह्यांच्या लीड बँकांच्या जबाबदा-यांमध्ये कोणताही बदल नाही. आपला विश्वासु,(अजय कुमार मिस्रा) |
पेज अंतिम अपडेट तारीख: