<font face="mangal" size="3px">तेलंगणा राज्यामध्ये एकवीस नवीन जिल्ह्यांचì - आरबीआय - Reserve Bank of India
तेलंगणा राज्यामध्ये एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती - लीड बँकांना जबाबदारी देणे
आरबीआय/2016-17/227 फेब्रुवारी 16, 2017 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महोदय/महोदया, तेलंगणा राज्यामध्ये एकवीस नवीन जिल्ह्यांची निर्मिती - लीड बँकांना जबाबदारी देणे राजपत्रीत अधिसूचना दि. ऑक्टोबर 11, 2016 अन्वये, तेलंगणा सरकारने, तेलंगणा राज्यामध्ये एकवीस नवीन जिल्हे निर्माण केल्याचे अधिसूचित केले होते. ह्या एकवीस नवीन जिल्ह्यांची जबाबदारी, खाली दिलेल्या लीड बँकांवर सोपविण्याचे ठरविण्यात आले आहे.
(2) ह्याशिवाय, बँकांद्वारे बीएसआर अहवाल पाठविण्यासाठी, नवीन जिल्ह्यांचे डिस्ट्रिक्ट वर्किंग कोड्सही देण्यात आले आहेत. (3) तेलंगणा राज्यामधील पूर्वीच्या जिल्ह्यांच्या लीड बँकांच्या जबाबदा-यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आपला विश्वासु, (अजय कुमार मिस्रा) |