RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78521293

गोमती नागरीय सहकारी बँक लि. जौनपुर, उत्तर प्रदेश - भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेले निर्देश मागे घेण्यात येणे

मे 13, 2019

गोमती नागरीय सहकारी बँक लि. जौनपुर, उत्तर प्रदेश - भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेले निर्देश मागे घेण्यात येणे

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35अ खाली, गोमती नागरीय सहकारी बँक लि. जौनपुर, उत्तर प्रदेश ह्यांना, निर्देश दि. जुलै 3, 2017 अन्वये निर्देश दिले होते. लागु करण्यात आलेले हे निर्देश वेळोवेळी सुधारित केले गेले होते व त्यांना मुदतवाढही देण्यात आली होती - शेवटची मुदतवाढ निर्देश दि. ऑक्टोबर 30, 2018 अन्वये, मे 10, 2019 पर्यंत देण्यात आली होती.

जनतेच्या हिताच्या दृष्टीने तसे करणे आवश्यक असल्याबाबत रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले असल्याने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35 अ च्या पोटकलम (2) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँक येथे, गोमती नागरीय सहकारी बँक लि. जौनपुर, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेले (आणि वेळोवेळी सुधारित करण्यात आलेले) निर्देश मागे घेत आहे.

ह्या निर्देशाची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे. ह्यानंतर वरील बँक तिचे नियमित बँकिंग व्यवहार करु शकते.

शैलजा सिंग
उप महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशनी : 2018-2019/2661

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?