भारत सरकार, इन्फ्लेशन इंडेक्स्ड बाँड्स-2023 ची पुनर् खरेदी करणार
फेब्रुवारी 5, 2016 भारत सरकार, इन्फ्लेशन इंडेक्स्ड बाँड्स-2023 ची पुनर् खरेदी करणार “भारत सरकारने, 1.44 टक्के इन्फ्लेशन इंडेक्स्ड सरकारी बाँड्स-2023” ची पुनर् खरेदी, उलट लिलावामार्फत, एकूण रु.6500 कोटींना(दर्शनी मूल्य) करावयाचे अधिसूचित केले आहे. अतिरिक्त असलेल्या रोख शिल्लक रकमांचा उपयोग करुन, सरकारी भाग धारणाचे (स्टॉक) मुदतपूर्व विमोचन करण्यासाठी, सरकारद्वारे ही पुनर् खरेदी केली जाईल. सरकारी स्टॉकची वरील पुनर् खरेदी केवळ तात्पुरत्या स्वरुपाची असेल. प्रतिभूतींसाठीचा लिलाव हा लिलाव-नमुन्यावर आधारित किंमतीवर केला जाईल. हे लिलाव बहुविध मूल्य रीतीचा वापर करुन केले जातील. ह्या लिलावासाठीच्या बोली, इलेक्ट्रॉनिक स्वरुपात, भारतीय रिझर्व बँक कोअर बँकिंग सोल्युशन(ई-कुबेर) प्रणालीवर, फेब्रुवारी 11, 2016 (गुरुवार) रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 पर्यंत सादर केल्या जाव्यात. ह्या निकालांचा परिणाम त्याच दिवशी घोषित केला जाईल. पुढील बाबतीत आरबीआयने हक्क राखून ठेवले आहेत.
अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1854 |
पेज अंतिम अपडेट तारीख: