RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78524669

एचसीबीएल को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ (युपी) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

फेब्रुवारी 20, 2019

एचसीबीएल को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ (युपी) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) च्या तरतुदींखाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, एचसीबीएल को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ (युपी) ह्यांचेवर रु.1,00,000/- (रुपये एक लाख) दंड लागु केला असून हा दंड, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित, कलम 35 अ खालील सर्वसमावेशक निर्देशांवर आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे, एक्सपोझर नॉर्म्स व वैधानिक आवश्यकता व तपासणी व ऑडिट प्रणाली ह्यांचे उल्लंघन केले गेल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1980

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?