<font face="mangal" size="3">एचसीबीएल को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ, उत्तर प्रदेश - आरबीआय - Reserve Bank of India
एचसीबीएल को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ, उत्तर प्रदेश - भारतीय रिझर्व बँकेने दिलेले निर्देश मागे
एप्रिल 13, 2018 एचसीबीएल को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ, उत्तर प्रदेश - भारतीय रिझर्व बँकेने दिलेले निर्देश मागे भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35अ खाली एप्रिल 10, 2015 च्या निर्देशान्वये एचसीबीएल को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ, उत्तर प्रदेश ह्यांना निर्देश दिले होते. लागु करण्यात आलेल्या निर्देशांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती व त्यात बदलही करण्यात आले होते व ऑक्टोबर 9, 2017 च्या निर्देशान्वये शेवटची मुदतवाढ एप्रिल 15, 2018 पर्यंत होती. जनतेच्या हितासाठी तसे करणे आवश्यक असल्याबाबत समाधान झाल्याने, भारतीय रिझर्व बँक, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35अ, पोट कलम(2) अन्वये, तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, येथे, एचसीबीएल को-ऑपरेटिव बँक लि., लखनौ, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेले (व वेळोवेळी बदल केलेले) वरील निर्देश, एप्रिल 13, 2018 पासून मागे घेत आहे. ह्या निदेशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात संबंधित जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे. ह्यानंतर वरील बँक तिचे नियमित बँकिंग व्यवहार करणे सुरु ठेवू शकते. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2735 |