RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78475101

हिंदी व इतर भारतीय भाषा, बँकर व ग्राहक ह्यांच्यादरम्यान एक पूल म्हणून काम करु शकतात : डॉ. रघुराम जी. राजन, गव्हर्नर, भारतीय रिझर्व बँक, जून 19, 2015

जून 19, 2015

हिंदी व इतर भारतीय भाषा, बँकर व ग्राहक ह्यांच्यादरम्यान एक पूल म्हणून काम करु शकतात :
डॉ. रघुराम जी. राजन, गव्हर्नर, भारतीय रिझर्व बँक, जून 19, 2015.

छायाचित्रे

“अलिकडे असे अनेक प्रसंग घडले आहेत की ज्यामध्ये, गरीब लोकांचे पैसे पाँझी योजनांमार्फत लुबाडले गेले होते. बहुतेक वेळा, आयुष्यभर कष्टाने कमविलेला पैसा अशा ह्या योजनांमुळे लोकांनी गमविला आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे परंतु त्यांना येत असलेल्या भाषेतून बँकिंग वाहिन्यांमध्ये प्रवेश करु शकत नाही अशा लोकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करुन देणे, ही सरकारची व बँक क्षेत्राचीच जबाबदारी आहे. त्यांना येत/समजत असलेल्या भाषेतच वित्तीय साक्षरता मिळविण्यासाठी आपणच व्यवस्था केली पाहिजे. ह्या प्रयत्नामध्ये, हिंदी व इतर भारतीय भाषा, ग्राहक व बँकर ह्यादरम्यान एका पुलाचे भूमिका बजावू शकतात.”

भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम जी. राजन ह्यांनी आज मुंबईमध्ये असे वक्तव्य केले.  2013-2014 वर्षासाठीची राष्ट्रभाषा ढाल, विजेत्या बँकांना त्यांच्याद्वारे दिली जाण्याचा हा प्रसंग होता.

पारितोषिक विजेत्या बँका व वित्तीय संस्थांचे अभिनंदन करताना, रिझर्व बँकेचे, उप गव्हर्नर, श्री. एस एस मुंदडा म्हणाले की, आज बँकिंग इंटरफेस झापाट्याने बदलत आहे. आज तो दगड-विटांच्या भिंती असलेल्या शाखा व संगणक बँकिंग पासून मोबाईल्स पर्यंत प्रगत झाला आहे. अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी, बँकिंग वार्ताहरांमार्फत बँकिंग सुविधा देऊ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बँकेची व्याप्ती जसजशी वाढेल तसतसे संबंधित प्रश्नही बदलत आहेत. प्रगत तंत्रज्ञानाच्या ह्या युगात, हॅकिंगबाबतच्या समस्या एक मोठे आव्हानच ठरले आहे. सायबर सुरक्षेबाबत व तंत्रज्ञानाचा वापर करताना काळजी घेण्याबाबत ग्राहकाला जाणीव करुन देणे ही आपलीच जबाबदारी आहे. मला असे वाटते की, ही जबाबदारी पूर्ण करण्यास, हिंदी व इतर भारतीय भाषांची आम्हाला निश्चितच मदत होईल.

भारतीय रिझर्व बँकेचे कार्यकारी संचालक, श्री. के के व्होरा, ह्यांनी बँका व वित्तसंस्थांच्या मुख्य अधिका-यांचे स्वागत केले, आणि श्रीमती सुरेखा मरांडी, मुख्य महाव्यवस्थापक (राजभाषा) ह्यांनी आभार प्रदर्शन केले.

ह्या प्रसंगी बँका व वित्तीय संस्थांचे अध्यक्ष व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संगीता दास
संचालक

वृत्तपत्रांसाठी निवेदन : 2014-2015/2699

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?