<font face="mangal" size="3px">स्वराज अभियानद्वारा, भारतीय राष्ट्रसंघ व इत - आरबीआय - Reserve Bank of India
स्वराज अभियानद्वारा, भारतीय राष्ट्रसंघ व इतर ह्यांच्याविरुध्द केलेल्या याचिकेमधील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी - नैसर्गिक आपत्तींनी ग्रस्त झालेल्या क्षेत्रांमध्ये, बँकांनी करावयाच्या मदत उपायांवरील मार्गदर्शक तत्वे
आरबीआय/2015-16/416 जून 2, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/ महोदय/महोदया, स्वराज अभियानद्वारा, भारतीय राष्ट्रसंघ व इतर ह्यांच्याविरुध्द केलेल्या याचिकेमधील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी - नैसर्गिक आपत्तींनी ग्रस्त झालेल्या क्षेत्रांमध्ये, बँकांनी करावयाच्या मदत उपायांवरील मार्गदर्शक तत्वे. वरील याचिकेच्या सुनावणी मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने, भारतीय राष्ट्र संघामधील संबंधित प्राधिकरणे, राज्य सरकारे, भारतीय रिझर्व बँक आणि इतर बँकांना निदेश दिले आहेत की, त्यांनी त्यांची धोरणे नित्यनेमाने राबवावीत. कारण, ही धोरणे, शेवटी आपल्याच देशाच्या हितासाठी असून, कुणा परक्यांच्या हितासाठी नाहीत. हे विचारात घेऊन, सर्व अनुसूचित वाणिज्य बँकांना (आरआरबी सोडून) सांगण्यात येते की, त्यांनी, आमचे महापरिपत्रक दि. जुलै 1, 2015 मध्ये दिलेल्या, नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त असलेल्या क्षेत्रांमध्ये, बँकांद्वारे करावयाचे मदत उपायावरील आमच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली जात असल्याची खात्री करुन घ्यावी. कृपया पोच पावती द्यावी. आपली, |