<font face="mangal" size="3">धनकोष नसलेल्या शाखांना सेवा देण्यात सुधारणì - आरबीआय - Reserve Bank of India
धनकोष नसलेल्या शाखांना सेवा देण्यात सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन
आरबीआय/2018-19/186 मे 23, 2019 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महोदय/महोदया, धनकोष नसलेल्या शाखांना सेवा देण्यात सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन कृपया वरील विषयावरील आमचे परिपत्रक आरबीआय/2015-16/293 डीसीएम (एनपीडी) क्र.2564/09.40.02/2015-16 दि. जानेवारी 21, 2016 चा संदर्भ घ्यावा. धनकोष नसलेल्या बँकांनी जमा केलेल्या रोख रकमेवर आकारण्याचे सेवा आकार, विद्यमान 100 नगांच्या प्रति पाकिटासाठी रु.5/- ह्या दरापेक्षा, कमाल प्रति पाकिट रु.8/- पर्यंत वाढविण्यास मोठ्या आधुनिक धनकोषांना परवानगी देण्याचे ठरविण्यात आले आहे. ह्यासाठी, आमचे परिपत्रक आरबीआय /2018-19/166 डीसीएम (सीसी) क्र.2482/03.39.01/2018-19 दि. एप्रिल 8, 2019 मध्ये देण्यात आलेली, धनकोषांसाठीची किमान मानके पूर्ण करणारे धनकोषच मोठे आधुनिक धनकोष म्हणून वर्गीकृत केले जातील. (2) अशा वर्गीकरणासाठी, बँका, त्यांचे धनकोष ज्यांच्या अधिकार क्षेत्राखाली आहेत त्या रिझर्व बँकेच्या इश्यु ऑफिसेसकडे जाऊ शकतात. संबंधित इश्यु ऑफिसने वर्गीकरण केल्यानंतरच वाढीव दर आकारले जाऊ शकतील. अशा मोठ्या आधुनिक धनकोषांशी जोडणी असलेल्या शाखांना, हे वाढीव दर लागु असल्याबाबत किमान 15 दिवस आधी पूर्व सूचना दिली जावी. आपला, (संजय कुमार) |